Friday, June 5, 2026
Homeभद्रावतीअमोल पोटे यांचा ट्रॅक्टर आणि चारगावची रेती; महसूल विभागाने केला खेळ खल्लास!

अमोल पोटे यांचा ट्रॅक्टर आणि चारगावची रेती; महसूल विभागाने केला खेळ खल्लास!

अमोल पोटे यांचा ट्रॅक्टर आणि चारगावची रेती; महसूल विभागाने केला खेळ खल्लास!

भद्रावती, न्यूज डेस्क
✍️ शंकर बोरघरे
📞 9525612555

चारगाव घाटातून सुरू असलेल्या कथित अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई करत अमोल पोटे यांच्या मालकीचा असल्याचे सांगितला जाणारा ट्रॅक्टर रेतीसह जप्त केला. या कारवाईमुळे परिसरातील रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

महसूल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मे रोजी रात्री उशिरा चारगाव घाटातून एक ब्रास रेती भरून ट्रॅक्टर विजासनच्या दिशेने निघाला होता. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रेती वाहतूक सुरू असतानाच महसूल विभागाला याची माहिती मिळाली. त्यानंतर मंडळ अधिकारी अनिल दडमल यांच्या पथकाने सापळा रचून संबंधित ट्रॅक्टर अडविला.

तपासणीदरम्यान ट्रॅक्टरमध्ये रेती आढळून आली. मात्र, रेती वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना किंवा कागदपत्रे सादर करता आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आली.

सूत्रांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर भद्रावती येथील अमोल पोटे यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले जात आहे. तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अनिल दडमल व खुशाल मस्के यांनी ही कारवाई केली.

या कारवाईनंतर परिसरात मिश्किल चर्चांनाही उधाण आले आहे. “चारगावची रेती घाटातून बाहेर काढणे सोपे असेल, पण महसूलच्या नजरेतून बाहेर काढणे कठीण,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. तर काहींनी गंमतीत, “रेतीचा ब्रास एकच होता, पण कारवाईचा धक्का अनेक ब्रासचा बसला,” अशी टिप्पणी केली.

महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध रेती वाहतुकीत गुंतलेल्या घटकांचे धाबे दणाणले असून, आगामी काळात अशाच कारवाया सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मध्यरात्रीची रेती सफर पडली महाग; महसूलच्या सापळ्यात ट्रॅक्टरसह रेती जप्त, परिसरात रंगल्या मिश्किल चर्चा! 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!