भद्रावतीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई; पाच जणांवर गुन्हा, २ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त
भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
Shankar Borghare, 95 52 61 25 55
भद्रावती शहरातील पाटील नगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भद्रावती पोलिसांनी रविवारी दुपारी धडक कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, तीन मोटारसायकली व पाच मोबाईल असा एकूण २ लाख १४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास पाटील नगर, भद्रावती येथे काही इसम पैशांची बाजी लावून पत्त्यांचा हार-जीतचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मुखबिरामार्फत प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाड टाकली असता पाच जण जुगार खेळताना आढळून आले.
कारवाईदरम्यान धनराज कवडुजी कांबळे (वय ६३, रा. पंचशील नगर, भद्रावती), धर्मराज नामदेव गायकवाड (वय ६६, रा. पटेल नगर, भद्रावती), रविंद्र बापूराव माकोडे (वय ५२, रा. किल्ला वॉर्ड, भद्रावती), अमोल शामराव दुरडकर (वय ३४, शिवाजी नगर, भद्रावती) आणि देवानंद खुशरंग पाटील (वय ५२, रा. सुमठाणा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींची अंगझडती व घटनास्थळाचा पंचनामा केला असता रोख रक्कम, तीन मोटारसायकली व पाच मोबाईल असा एकूण २, लाख १४ हजार ८०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अप.क्र. ७१५/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात
पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, गजानन तुपकर, सहायक पोलीस फौजदार महेंद्र बेसरकर, पोलीस हवालदार अनुप आस्टूनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, पोलीस अंमलदार खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड यांनी केली.


