काल्पनिक व्यंगकथा : “योग्या सेठचा जनसेवेचा प्रवास…!”
विशेष प्रतिनिधी , व्यंग विशेष
एका काल्पनिक नगरात योग्या सेठ नावाचे गृहस्थ राहत होते. निवडणुकीपूर्वी त्यांचा सट्ट्याचा धंदा इतका गुप्त होता की, चिमणीने जरी पाहिलं तरी तीही गप्प राहायची!
फोनवर फक्त एकच संदेश…
“आकडा तयार आहे… बाकी भेटल्यावर!”
कोणी विचारलं, “काय करता?”
तर उत्तर ठरलेलं…
“समाजसेवा!”
आणि खिशात मात्र आकड्यांची वही.
काळ बदलला… निवडणूक झाली… जनता भुलली… आणि योग्या सेठ नगरसेवक झाले.
नगरसेवक होताच वातावरणही बदललं. पूर्वी कानोकानी होणारी चर्चा आता चौकाचौकात रंगू लागली.
चहाच्या टपरीवर लोक हसत म्हणू लागले…
“पूर्वी लपून सट्टा… आता उघड्यावर सत्ता!”
दुसरा म्हणाला…
“नगरसेवक झाला की जनतेचा सेवक, की आकड्यांचा मालक?”
तर तिसरा मिश्कीलपणे बोलला…
“पूर्वी योग्या सेठ शोधावा लागायचा… आता चौकातच भेटतो!”
यावर योग्या सेठ फक्त हसत म्हणाले…
“जनतेचा विश्वास आहे… बाकी सगळं अफवा आहे!”
क्रमशः…
योग्या सेठची कथा आता खरी रंगत पकडणार आहे. नगरसेवक झाल्यानंतर कोणकोणत्या नव्या घडामोडी घडल्या? कोण आहेत या कथेतील इतर रहस्यमय पात्रं? आणि पुढे कोणते धक्कादायक व्यंगात्मक खुलासे होणार?
वाचा… “योग्या सेठ” व्यंगमालिकेचा पुढील भाग… कारण कथा अजून बाकी आहे!
टीप : ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून तिचा कोणत्याही व्यक्ती, घटना, संस्था किंवा ठिकाणाशी कोणताही संबंध नाही. साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


