भद्रावतीला मिळाले परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे
तीन महिन्यांसाठी भद्रावती पोलीस ठाण्याची धुरा; कर्तव्यदक्ष अधिकारी योगेश्वर पारधी यांचीही साथ कायम
भद्रावती, न्यूज डेस्क , शंकर बोरघरे 95 52 61 25 55
भद्रावती शहर व तालुक्याच्या कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली असून, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांनी दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी भद्रावती पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. पुढील तीन महिने म्हणजेच १३ आठवडे ते भद्रावती पोलीस ठाण्याचा कारभार पाहणार आहेत.
सचिन खेत्रे यांच्या पदभारामुळे भद्रावतीच्या पोलीस प्रशासनाच्या कामकाजाला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरासह ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारीवर नियंत्रण, नागरिकांच्या तक्रारींवर तत्पर कार्यवाही तसेच विविध गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने त्यांच्या कार्यपद्धतीकडे नागरिकांचे लक्ष राहणार आहे.
विशेष म्हणजे, भद्रावती परिसरात आपल्या कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीमुळे नागरिकांचा विश्वास संपादन करणारे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांचीही भद्रावतीतील उपस्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे सचिन खेत्रे यांच्यासोबत योगेश्वर पारधी यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळणार असल्याने पोलीस प्रशासनाच्या कामकाजाला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक म्हणून सचिन खेत्रे यांच्यासाठी पुढील तीन महिने महत्त्वाचे ठरणार आहेत. या कालावधीत भद्रावती शहर तसेच ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावी ठेवणे, गुन्हेगारीला आळा घालणे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे, याकडे विशेष लक्ष राहणार आहे.
दरम्यान, योगेश्वर पारधी यांच्या कर्तव्यदक्ष कार्यपद्धतीमुळे भद्रावती परिसरात पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे नव्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांसोबत अनुभवी पोलीस निरीक्षक यांची साथ कायम असल्याने दोन्ही अधिकाऱ्यांच्या समन्वयातून भद्रावतीतील पोलीस कारभार अधिक सक्षम होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सचिन खेत्रे यांचे आगमन आणि पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांची कायम उपस्थिती यामुळे भद्रावतीच्या पोलीस प्रशासनाला दुहेरी बळ मिळाले आहे. पुढील तीन महिने म्हणजेच १२ आठवडे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून, नागरिकांना अधिक तत्पर आणि प्रभावी पोलीस सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.


