Friday, September 4, 2026
Homeभद्रावतीभद्रावतीला मिळाले परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे

भद्रावतीला मिळाले परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे

भद्रावतीला मिळाले परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे

कर्तव्यदक्ष अधिकारी योगेश्वर पारधी यांचीही भद्रावतीत कायम उपस्थिती; कायदा-सुव्यवस्थेला मिळणार आणखी बळ

भद्रावती,  न्यूज  डेस्क ✍️

भद्रावती शहर व तालुक्याच्या कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब समोर आली असून, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांची भद्रावती येथे नियुक्ती झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामकाजाला आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, भद्रावती परिसरात आपल्या कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारे पोलीस उपअधीक्षक योगेश्वर पारधी हे देखील भद्रावतीत कार्यरत राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भद्रावतीला एकाच वेळी दोन सक्षम अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व नेतृत्व लाभणार आहे.

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक म्हणून सचिन खेत्रे यांच्यासमोर भद्रावतीतील कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारीवर नियंत्रण, अवैध धंद्यांवर कारवाई तसेच नागरिकांच्या तक्रारींना प्रभावी प्रतिसाद देण्याचे महत्त्वाचे आव्हान असणार आहे.

तर दुसरीकडे, योगेश्वर पारधी यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध कारवाया आणि कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे त्यांच्याकडूनही भद्रावतीतील पोलीस यंत्रणेला मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे नव्या अधिकाऱ्यांच्या आगमनासोबतच अनुभवी अधिकाऱ्यांची साथ मिळाल्याने पोलिसांच्या कामकाजात समन्वय आणि परिणामकारकता वाढण्याची शक्यता आहे.

भद्रावती शहरासह ग्रामीण भागात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे, सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण देणे आणि गैरप्रकारांना आळा घालणे यासाठी नव्या नियुक्तीमुळे पोलीस प्रशासनाकडून अधिक प्रभावी पावले उचलली जातील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

नवे अधिकारी सचिन खेत्रे यांचे आगमन आणि कर्तव्यदक्ष अधिकारी योगेश्वर पारधी यांची कायम उपस्थिती यामुळे भद्रावती पोलिसिंगला नवे बळ मिळणार असल्याचे चित्र आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!