उर्जानगरमध्ये ‘पोषण माह’चा जागर; अंगणवाडीतून आरोग्याचा संदेश
बालकांच्या पोषणासाठी जनजागृती; ग्रामसेवक युवराज वेस्कडे व शिवसेना जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांची प्रमुख उपस्थिती
चंद्रपूर न्यूज डेस्क, शंकर बोरघरे
महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पोषण माह २०२६’ अंतर्गत उर्जानगर ग्रामपंचायत परिसरातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषणविषयक जनजागृती उपक्रम घेण्यात आला. बालकांचे आरोग्य, योग्य आहार आणि पोषणाचे महत्त्व याबाबत यावेळी माहिती देण्यात आली.
या उपक्रमात कोंडी क्रमांक १ च्या अंगणवाडी सेविका सौ. इंदिरा वाकुडकर, क्रमांक २ च्या सेविका सौ. सुनीता आवळे आणि क्रमांक ३ च्या सेविका सौ. शोभा वाकुडकर यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाला उर्जानगर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक युवराज वेस्कडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर शिवसेना जिल्हाध्यक्ष संतोष पारखी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बालकांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, कुपोषणाबाबत जनजागृती व्हावी आणि पालकांनी बालकांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे, यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पोषणाचे महत्त्व पटवून देत “निरोगी बालक म्हणजे निरोगी समाजाची पायाभरणी” असल्याचे सांगितले. अंगणवाडी सेविकांनीही पोषण अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला.


