महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांना सन्मानपूर्वक निरोप
सिंदेवाहीतील कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक; तालुका अध्यक्ष वहाबअली सय्यद यांच्याहस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह प्रदान
सिंदेवाही , न्यूज डेस्क
सिंदेवाही पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांची नुकतीच ब्रम्हपुरी येथे बदली झाली. त्यांच्या बदलीनिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई तालुका शाखा सिंदेवाहीच्या वतीने भावपूर्ण निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
यावेळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष वहाबअली सय्यद यांनी पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन शुभेच्छांसह निरोप दिला. त्यांच्या सिंदेवाहीतील कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे यावेळी कौतुक करण्यात आले.
सिंदेवाही परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. पत्रकार आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वयातून सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक काम करता आल्याचेही यावेळी उपस्थितांनी सांगितले.
या निरोप समारंभाला ॲड. नंदकुमार गंडाटे, मोहम्मद रफी शेख, धनराज सरपाते, तेजेंद्र नागदेवते, सोमेश्वर पाकेवार, कलाम शेख तसेच सामाजिक युवा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अमोल निनावे यांच्यासह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई तालुका शाखा सिंदेवाहीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा देत निरोप दिला.


