Monday, October 26, 2026
Homeभद्रावती‘बजरंग माळी’च्या फेसबुक पोस्टवरून भाजप आक्रमक आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी पोलिसांकडे निवेदन; कायदेशीर कारवाईची...

‘बजरंग माळी’च्या फेसबुक पोस्टवरून भाजप आक्रमक आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी पोलिसांकडे निवेदन; कायदेशीर कारवाईची मागणी

‘बजरंग माळी’ला फेसबुक पोस्ट भोवणार?

आमदारांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी; भाजपा शहराध्यक्ष किशोर गोवरदिपे यांचे पोलिसांकडे निवेदन

भद्रावती,  न्यूज डेस्क,  शंकर बोरघरे 

भद्रावती-वरोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपा शहराध्यक्ष किशोर महादेव गोवरदिपे यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात निवेदन दिले.

‘बजरंग माळी’ या नावाने असलेल्या फेसबुक अकाउंटवरून आमदारांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. या पोस्टची पोलिसांनी चौकशी करून संबंधित फेसबुक अकाउंट कोणाचे आहे, पोस्ट कोणी केली याचा शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित फेसबुक पोस्टचे स्क्रीनशॉट पोलिसांकडे देण्यात आले असून, चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यावर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष किशोर गोवरदिपे यांनी केली आहे.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष किशोर गोवरदिपे, मंडळ अध्यक्ष ग्रामीण दयानंद जांभुळे, गोपाल गोसवाडे, संजय राय, संजय वासेकर, सत्तार भाई, भाजयुमो प्रदेश सचिव इम्रान खान, डॉ. रतन बाला आणि तौसिब शेख उपस्थित होते.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!