सेवा ज्योती यात्रेने भद्रावती दुमदुमली; आमदार करण देवतळे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा उत्साहात
सेवा, समर्पण आणि राष्ट्रभक्तीचा संदेश; गुणवंतांचा सत्कार, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भद्रावती, न्यूज डेस्क
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, समर्पण आणि राष्ट्रभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित ‘सेवा ज्योती यात्रा’ भद्रावतीत उत्साहात पार पडली. यानिमित्त सेवादल मैदानावर आयोजित जाहीर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी आमदार करण देवतळे यांच्या हस्ते समाजप्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. सुवर्णा प्रकाश पिंपळकर, समाजप्रबोधन कीर्तनकार तसेच योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून गोल्ड मेडल मिळविणाऱ्या कु. पूजा देऊळकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला किशोरभाऊ बावणे विधानसभा प्रमुख, किशोर गोवारदिपे, भाजपा शहराध्यक्ष भद्रावती, विशाल ठेंगणे, युवा मोर्चा अध्यक्ष आणि वृषालीताई पांढरे, महिला आघाडी अध्यक्ष यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवा आणि समर्पणासोबत राष्ट्रभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमामुळे भद्रावतीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


