आमदार करण देवतळेंच्या नेतृत्वात भद्रावतीत ‘सेवा ज्योती’ यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
भव्य बाईक रॅली व जाहीर सभा; भाजप पदाधिकारी, महिला व युवा कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
भद्रावती, न्यूज डेस्क
शंकर बोरघरे
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, समर्पण आणि राष्ट्रभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित ‘सेवा ज्योती यात्रा’ भद्रावती शहरात उत्साहात पार पडली. वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण संजयजी देवतळे यांच्या नेतृत्वात शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. त्यानंतर नगर परिषदेजवळील सेवादल मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली.
बाईक रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला आघाडी तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीदरम्यान सेवा, समर्पण आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला.
यानंतर सेवादल मैदानावर झालेल्या जाहीर सभेत आमदार करण संजयजी देवतळे, विधानसभा प्रमुख किशोरभाऊ बावणे, भाजपा शहराध्यक्ष किशोर गोवारदिपे आणि माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष विशाल ठेंगणे, महिला आघाडी अध्यक्ष वृषालीताई पांढरे, अनिलभाऊ धानोरकर, प्रवीण सातपुते, अमित गुंडावार, इम्रान खान, कविता सावनकर, सोनम भोसकर, माधुरी ढगे, डिम्पल गुरनुले, विजय वानखेडे, गोपाल गोस्वाडे, विनोद पांढरे सर, अनंता मांढरे, सत्तार शेख, चेतन गुंडावार, बबलू सय्यद, तोशिब शेख, अमर महाकुळ, माधव बांगडे, डॉ. बाला राजू क्षीरसागर, राकेश खुसपुरे, रोशन इखार, गजानन बोढाले, महादेव कालर, सुनील पढाल, संतोष नागपुरे, बंडू दरेकर, ओंकार गारसे, मोनू पारधे, अनंता ताठे, धनंजय निवलकर, भागम देवगडे, मधुकर सावनकर, चेतन स्वान, अनंता गुंडावार, मुकेश बनिक, गोविंदा बिंजावे, मनोहर साळवे, कवाडुजी खुंटेमाटे, पांढरी मामीडवार सर, सर्पिपळकर, प्रशांत झाडे, संदीप कुमरे, प्रदीप लोणकर, संजय रॉय आणि शत्रुघन पुल्लरवार आदींसह भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, महिला भगिनी आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार करण देवतळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या उपक्रमाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाईक रॅली आणि जाहीर सभेच्या माध्यमातून सेवा, समर्पण आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


