धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी चंद्रपुरात जय्यत तयारी; जिल्हाध्यक्ष प्रिया खाडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य आयोजन
१५ व १६ ऑक्टोबरला प्रबोधनात्मक कार्यक्रम, भीमगीतांचा जंगी सामना; RPI (A)चे राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदाधिकारी राहणार उपस्थित
चंद्रपूर, न्यूज डेस्क, 95 52 61 25 55
शंकर बोरघरे, राजु एन शंभरकर
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर)च्या वतीने चंद्रपुरात १५ व १६ ऑक्टोबर रोजी भव्य प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि भीमगीतांचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष प्रिया खाडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आयोजनासाठी सज्ज झाले आहेत.
दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन RPI (A)चे राष्ट्रीय महासचिव डॉ. मोहनलाल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रिया खाडे राहणार असून, RPI (A)चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिपकभाऊ निकाळजे आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मा. भूपेश थुलकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. बाळासाहेब पवार, मा. सुनीता ताई चव्हाण, मा. संतोषभाई इंगळे, मा. महेंद्र मुनेश्वर, मा. योगेशदादा रायपुरे, मा. हर्षवर्धन जुलमे, मा. मनीषभाई गवई आणि मा. शकुंतलाताई लिपटे उपस्थित राहणार आहेत.
दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात अरुण सोनटक्के, भूषण काटकर, यशवंत गायकवाड, संभाजी दुंगे, विजय फुलझले, मीनाताई बाराहाते आणि विठ्ठल गायकवाड हे गायक सहभागी होणार आहेत.
त्यानंतर सायंकाळी ६ वाजल्यापासून दुय्यम सामना रंगणार असून, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक सुरज आतिश आणि संविधान मनोहर यांच्या सहभागाने हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानेश्वर नगराळे, शहराध्यक्ष चंद्रपूर RPI (A) यांच्या वतीने करण्यात आले असून, विवेक खाडे, RPI (A) युवा नेते यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.
यावेळी सुभाषताई कुंभारें, जिल्हा महासचिव, मालाताई रामटेके, जिल्हा उपाध्यक्ष, रक्षांदा रत्नपारखी, चंद्रपूर तालुकाध्यक्ष, विकास कांबळे, कोरपना तालुका अध्यक्ष, उज्वलाताई भगत, महिला अध्यक्ष कोरपना आणि खुशाबराव श्रीडाम यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष प्रिया खाडे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या भव्य कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


