Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूरमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई (चंद्रपूर) डिजिटल मीडिया नियुक्ती; कामडे अध्यक्ष,...

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई (चंद्रपूर) डिजिटल मीडिया नियुक्ती; कामडे अध्यक्ष, सुत्रपवार सचिव संघटनेला नवा जोश!

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई (चंद्रपूर) डिजिटल मीडिया नियुक्ती; कामडे अध्यक्ष, सुत्रपवार सचिव संघटनेला नवा जोश!

मूल (प्रतिनिधी),

जूबेर शेख ✍️

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई (जि. चंद्रपूर) यांच्या वतीने मूलच्या शासकीय विश्रामगृहात झालेली पत्रकारांची बैठक एकदम रंगात पार पडली. वातावरण उत्साही, चर्चा थेट मुद्द्यावर आणि निर्णय दमदार असं चित्र या बैठकीत पाहायला मिळालं.

संघटन वाढवायचं, पत्रकारांचे प्रश्न थेट हाताळायचे आणि आता वाढत चाललेल्या डिजिटल मीडियाला मजबूत करायचं यावर सगळ्यांनी जोरदार चर्चा केली. विशेष म्हणजे डिजिटल मीडियाला पुढे नेण्यासाठी काही ठोस निर्णयही घेण्यात आले.

यात मुख्य लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे रोहित कामडे यांची डिजिटल मीडिया मूल तालुका अध्यक्षपदी आणि धर्मेंद्र सुत्रपवार यांची सचिवपदी एकमताने झालेली निवड. दोघांवर मोठी जबाबदारी देत संघटनेनं नव्या दमाने कामाला लागण्याचा इशारा दिला.
या नावांची शिफारस मूल,सावली तालुका अध्यक्ष सतीश राजूरवार यांनी केली होती.

संपूर्ण निवड प्रक्रिया राज्य उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल थोरात आणि राजुरा तालुका अध्यक्ष प्रा. अनंत डोंगे यांच्या समन्वयातून बैठक छान रंगली.

तसंच राज्य अध्यक्ष गोविंद वाकोडे, राज्य संघटक तथा संस्थापक संजय भोकरे, कार्याध्यक्ष निलेश सोमानी, राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, राज्य प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव आणि डिजिटल मीडिया प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या माहितीनुसार ही बैठक यशस्वी झाल्याचं सांगितलं जातं.
त्यांच्या पाठबळामुळे चंद्रपूर जिल्ह्यात संघटना अजून मजबूत होत असल्याचं चित्र दिसतंय.

प्रा. महेश पानसे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं“आता काळ बदललाय, पत्रकारांनी डिजिटलमध्ये ताकद दाखवली पाहिजे. वेगवान आणि अचूक बातमी देणं हीच खरी ताकद आहे.” त्यांच्या भाषणाने उपस्थितांना नव्या दिशेची जाणीव झाली.

यावेळी अनिल गिरमिल्ला, राजेंद्र वाढई यांच्यासह देवा पिंपळे, हेमचंद उराडे, जुबेद शेख, प्रकाश चलाख, रोशन बोरकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सगळ्यांनी मिळून संघटना अजून मजबूत करण्याचा निर्धार केला.

शेवटी नव्या पदाधिकाऱ्यांचा जोरदार सत्कार झाला आणि “पत्रकारांच्या हक्कासाठी आता जोरात लढू” असा इरादा व्यक्त करण्यात आला. एकूणच, या बैठकीमुळे मूल तालुक्यात पत्रकार संघटनेला नवा जोश मिळाल्याचं स्पष्ट दिसून आलं.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!