नागरिकांच्या तक्रारींकडे आ. करण देवतळे यांचे लक्ष; लवकरच निर्णयाची शक्यता..!
महसूल मंत्र्यांकडे इम्रान खान यांचे निवेदन; चौकशी व कारवाईची मागणी
“महिनोनमहिने फाईल्स अडकवतात” इम्रान खान यांचा थेट आरोप
भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
Shankar Borghare
9552612555
भद्रावती तहसील कार्यालयातील दिरंगाई, प्रलंबित फाईल्स आणि तणावपूर्ण वातावरणाचा प्रश्न आता गंभीर टप्प्यावर पोहोचला असून, नागरिकांसह महसूल कर्मचारीही त्रस्त झाल्याचे वास्तव समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव इम्रान खान यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन सादर करून तात्काळ चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.
तसेच, या प्रकरणाची दखल स्थानिक आमदार करण देवतळे यांनी घेतल्याची माहिती समोर येत असून, नागरिकांच्या तक्रारींवर लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तहसील कार्यालयात जमीन फेरफार, हद्दकायम यांसारख्या साध्या कामांसाठीही नागरिकांना महिनोनमहिने फेऱ्या माराव्या लागत आहेत. कागदपत्रे पूर्ण असतानाही फाईल्स प्रलंबित ठेवल्या जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. “महिनोनमहिने फाईल्स अडकवतात, हा प्रकार सामान्य जनतेसाठी अन्यायकारक आहे,” असा थेट आरोप इम्रान खान यांनी केला आहे.
कर्मचाऱ्यांवरही अन्याय; तणावाखाली कामकाज..!
दरम्यान, तहसील कार्यालयातील सुमारे १८ कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत कार्यालयातील तणावपूर्ण वातावरण, मानसिक ताण आणि अपमानास्पद वागणुकीबाबत गंभीर तक्रारी केल्या आहेत.
कर्मचाऱ्यांच्या मते,..!
वारंवार ओरडणे व दमदाटी
योग्य मार्गदर्शनाचा अभाव
सतत टेबल व जबाबदाऱ्या बदल
मानसिक दबावाखाली काम…!
यामुळे कर्मचारी तणावाखाली काम करत असून, त्याचा थेट परिणाम कार्यालयातील कामकाजावर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जुनी प्रकरणेही उघडकीस; दिरंगाईचा पॅटर्न स्पष्ट…!
भद्रावती तहसीलमधील दिरंगाई ही नवीन बाब नसून, याआधीही अनेक प्रकरणांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शेतकरी परमेश्वर मेश्राम यांच्या प्रकरणात त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली होती…!
तसेच गावराळा येथील सेवानिवृत्त कर्मचारी प्रभाकर उंबरकर यांच्या जमीन फेरफार प्रकरणात दीर्घकाळ दिरंगाई झाल्यानंतरच राजकीय हस्तक्षेपामुळे काम मार्गी लागले…!
या घटनांमुळे तहसील कार्यालयातील कामकाजाची पद्धतच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
प्रमुख मुद्दे…!
फाईल्सवर मोठ्या प्रमाणात दिरंगाई
नागरिकांना वारंवार हेलपाटे
महसूल कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण व अन्यायाचे आरोप
कार्यालयातील तणावपूर्ण वातावरण..!
कामकाजात समन्वयाचा अभाव..!
मंत्र्यांकडे ठाम मागण्या…!
इम्रान खान यांनी निवेदनातून
संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी
प्रलंबित फाईल्स तात्काळ निकाली काढणे
दोषींवर कठोर कारवाई
नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी कडक निर्देश
संबंधित अधिकाऱ्यांबाबत योग्य निर्णय
अशा मागण्या केल्या आहेत.
महसूल प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह????
सतत समोर येणाऱ्या तक्रारी, जुनी प्रकरणे आणि कर्मचाऱ्यांचा संताप पाहता भद्रावती तहसील कार्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच आ. करण देवतळे काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


