नियमभंगाला लगाम; कोटींचा दंड वसूल
API माया चाटसे यांचे प्रभावी नेतृत्व; महामार्ग पोलीस ठरले रस्त्यावरील खरे रक्षक..!
चंद्रपूर न्यूज डेस्क
✍️Shankar Borghare
9552612555चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी महामार्ग पोलीस मदत केंद्र, चंद्रपूर यांनी सन २०२५, २६ या कालावधीत राबविलेली विशेष मोहीम अत्यंत प्रभावी ठरली आहे. वर्षभर सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध आणि कडक कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, जिल्ह्यातील वाहतूक शिस्तीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.
महामार्ग पोलिसांच्या अधिकृत आकडेवारीनुसार, या कालावधीत २०,३९६ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यातून १ कोटि ७० लाख ७९ हजार ७०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत दारू पिऊन वाहन चालवणे (ड्रंक अँड ड्राईव्ह), वेगमर्यादा उल्लंघन, सिग्नल तोडणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचा समावेश आहे.
ही मोहीम पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. तर सहा. पोलीस निरीक्षक (API) माया चाटसे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सातत्याने काम करत ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.
महामार्ग पोलिसांनी वर्षभर विविध ठिकाणी नाकाबंदी, विशेष तपासणी मोहिमा आणि ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी प्रभावीपणे राबवली. विशेषतः रात्रीच्या वेळी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात कडक कारवाई करण्यात आली. नियमभंग करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयीन कारवाई देखील करण्यात आली आहे.
याशिवाय, पोलिसांनी जनजागृतीवर भर देत नागरिकांना HSRP नंबर प्लेट, रिफ्लेक्टर, इंडिकेटर यांसारख्या सुरक्षात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी विविध उपक्रम राबवून वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देण्यात आले.
महामार्ग पोलिसांच्या या सातत्यपूर्ण कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल दिसून येत आहेत. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरत आहे. “दारू पिऊन वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा आहे; अशा प्रकारांवर पुढेही कठोर कारवाई सुरूच राहील,” असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, उत्कृष्ट कामगिरीबद्दल माया चाटसे यांना “सर्वोत्कृष्ट कामगिरी” म्हणून प्रथम पुरस्कार देण्यात आला असून, संपूर्ण पथकाच्या कार्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
महामार्ग पोलीस चंद्रपूर यांची ही मोहीम केवळ दंड वसुलीपुरती मर्यादित नसून, ती नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची ठरत आहे. रस्त्यावर शिस्त निर्माण करून अपघातांवर नियंत्रण मिळवण्यात या मोहिमेची मोठी भूमिका असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे ही काळाची गरज असल्याचे पुन्हा चर्चेचा भाग झाला आहे.
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


