Friday, June 5, 2026
Homeचंद्रपूरटेमुर्डा गावात देशी दारू दुकानाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध;

टेमुर्डा गावात देशी दारू दुकानाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध;

टेमुर्डा गावात देशी दारू दुकानाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; आंदोलनाचा इशारा

दारू दुकानाला वीज कनेक्शन देऊ नका; महावितरणलाही ग्रामस्थांचा इशारा

जिल्हा विशेष प्रतिनिधी
✍️ प्रा. अनंत डोंगे
📞 9765233516

जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील टेमुर्डा गावात प्रस्तावित देशी दारू दुकानावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून गावकरी आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. संबंधित दारू दुकानाला वीज कनेक्शन देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे (महावितरण) लेखी अर्जाद्वारे केली आहे.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, सर्व्हे क्रमांक २७७/ २ मधील प्लॉट क्रमांक ८ येथे देशी दारू दुकान सुरू करण्यासाठी परवानगी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र संबंधित जागा निवासी भागात असून परिसरात शासकीय दवाखाना, तलाठी कार्यालय तसेच मुख्य बाजारपेठ असल्याने या ठिकाणी दारू दुकान सुरू करणे अयोग्य असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

याशिवाय ग्रामपंचायतीची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता संबंधित परवाना मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची अधिकृत लेखी मंजुरी मिळाल्याशिवाय संबंधित ठिकाणी वीज पुरवठा करण्यात येऊ नये, अशी ठाम मागणी महावितरण प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

या संदर्भातील निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अभियंता तसेच ग्रामपंचायत प्रशासनालाही पाठविण्यात आल्या आहेत. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास गावकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, टेमुर्डा गावातील प्रस्तावित देशी दारू दुकानाच्या मंजुरी प्रक्रियेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परवानगी नेमकी कशी मिळाली, कोणत्या निकषांवर मंजुरी देण्यात आली आणि ग्रामस्थांचा विरोध का वाढत आहे, याबाबत गावात विविध चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणामागील संपूर्ण वास्तवाचा उलगडा पुढील भागात होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!