Saturday, July 4, 2026
Homeचंद्रपूरमध्यप्रदेशातून सुरू होती विदेशी दारूची तस्करी; वरोरा हद्दीत एलसीबीची धडक कारवाई

मध्यप्रदेशातून सुरू होती विदेशी दारूची तस्करी; वरोरा हद्दीत एलसीबीची धडक कारवाई

मध्यप्रदेशातून सुरू होती विदेशी दारूची तस्करी; वरोरा हद्दीत एलसीबीची धडक कारवाई

चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️

मध्यप्रदेशातून चंद्रपूर जिल्ह्यात अवैधरित्या विदेशी दारूची तस्करी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने वरोरा हद्दीत धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला. या कारवाईत सुमारे ५ लाख १५ हजार ८५८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर एक आरोपी फरार आहे.

दि. ३० जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरोरा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा नंदोरी टी-पॉइंट येथे सापळा रचून विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकला. या कारवाईत २९ पेट्यांमधील ३५३ विदेशी दारूच्या (७५० मिली) बाटल्या, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टोयोटा इटिओस जीडी (एमएच ०१ बीटी १०८७) कार तसेच तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये १ लाख ८३ हजार ८५८ रुपयांची विदेशी दारू, ३ लाख रुपयांची कार आणि ३० हजार रुपयांचे तीन मोबाईल फोन असा एकूण ५ लाख १५ हजार ८५८ रुपयांचा मुद्देमाल आहे.

या प्रकरणी नरेंद्र जितेंद्र भाट (वय ३१, रा. जलनगर, चंद्रपूर) आणि सौ. दामिनी नरेंद्र भाट (रा. जलनगर, चंद्रपूर) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम ६५ (ई)(अ) व ८३ अन्वये वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्या उर्फ सूरज परसंगे (रा. जलनगर, चंद्रपूर) हा आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष निपोनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात एपीआय बलराम झाडोकार, एचसी जयसिंग, संतोष येलपूलवार, गणेश भोयर, सचिन गुरनुले, विठ्ठल काकडे आणि गजानन मडावी यांनी सक्रिय सहभाग घेतला

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!