९ जण ताब्यात, ५ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त…
भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
Shankar Borghare, 95 52 61 25 55
भद्रावती शहरातील डोलारा तलाव, पंचशील नगर परिसरात ५२ पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ३० जुलै रोजी रात्री पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून ९ जणांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
या कारवाईत धिरज शंकर शेट्टी (वय ३२, रा. झिंगूजी वॉर्ड), ऋषिकेश भांकर मडावी (वय २५, रा. पंचशील वॉर्ड), मुकेश वासुदेव सोना (वय ३५, रा. डोलारा तलाव), अजित शंकर शेट्टी (वय २८, रा. किल्ला वॉर्ड), मन्नू वासुदेव सोना (वय ३८, रा. डोलारा तलाव), अमित ओमप्रकाश टेभुर्णे (वय २६, रा. पंचशील नगर), उमेश भामराव रणदिवे (वय ३५, रा. डोलारा तलाव), राकेश नामदेव कुळमेथे (वय ३५, रा. पंचशील नगर) आणि सोनू ज्ञानेश्वर ढेंगळे (वय ३६, रा. किल्ला वॉर्ड) यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींची अंगझडती व घटनास्थळाचा पंचनामा करताना ७ मोटारसायकली, ६ मोबाईल फोन तसेच इतर साहित्य असा एकूण ५, लाख ९८ हजार ५३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२(अ) अन्वये भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गजानन तुपकर, संतोष केदार, सफौ. महेंद्र बेसरकर, पोलीस हवालदार अनुप आस्टूनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार, पोलीस अंमलदार खुशाल कावळे, योगेश घाटोळे आणि संतोष राठोड यांनी सहभाग घेतला.
या धडक कारवाईमुळे भद्रावती शहरातील अवैध जुगार अड्डे चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या अवैध धंद्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.


