Saturday, April 18, 2026
Homeचंद्रपूरस्वप्नांना व्यासपीठ देणारी पावले; विदर्भ वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून जिल्हाभर खेलकूद केंद्रांची...

स्वप्नांना व्यासपीठ देणारी पावले; विदर्भ वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून जिल्हाभर खेलकूद केंद्रांची उभारणी…! चंद्रपूर

चंद्रपूर (प्रतिनिधी):- वनवासी समाजातील तरुणांमध्ये दडलेली गुणवत्ता, मेहनत आणि जिद्द योग्य संधीअभावी अनेकदा पुढे येऊ शकत नाही. हीच संधी उपलब्ध करून देण्यासाठी विदर्भ वनवासी कल्याण आश्रम यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात खेलकूद केंद्रांची उभारणी करण्याचा व्यापक विचार पुढे आला आहे.
याच अनुषंगाने भद्रावती व वरोरा तालुक्यात विदर्भ कल्याण आश्रमाच्या सदस्यांच्या भेटी घेण्यात आल्या.
या भेटीदरम्यान विभाग संघटन मंत्री गोपाल गोटी तसेच सह जिल्हा खेलकूद प्रमुख शंकर बोरघरे उपस्थित होते.
या भेटी औपचारिकतेपुरत्या न राहता, त्या थेट समाजातील अपेक्षा आणि तरुणांच्या भविष्यासंदर्भातील विचारांशी जोडलेल्या ठरल्या.
चर्चेदरम्यान अनेक पालक व कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मोकळेपणाने मांडल्या. “मुलांमध्ये क्षमता आहे, पण योग्य मैदान, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध नाही,” अशी भावना यावेळी व्यक्त झाली. याच भावनेतून जिल्हाभर खेलकूद केंद्र उभारण्याचा विचार अधिक ठोस झाला.
या प्रस्तावित केंद्रांच्या माध्यमातून वनवासी व ग्रामीण भागातील युवक,युवतींना नियमित सरावासाठी सुविधा, प्रशिक्षित मार्गदर्शन, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक संधी मिळणार आहेत.
खेळाच्या माध्यमातून आत्मविश्वास, आरोग्य, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
विदर्भ वनवासी कल्याण आश्रमाने आजवर शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची परंपरा पुढे नेत, आता खेलकूद क्षेत्रातही तरुणांच्या आत्मसन्मानाला बळ देणारा नवा अध्याय सुरू करण्याचा निर्धार या भेटीतून स्पष्ट झाला आहे.
थोडक्यात, भद्रावती ,वरोरा तालुक्यातील या भेटी म्हणजे केवळ चर्चा नव्हे, तर त्या जिल्हाभरातील वनवासी तरुणांच्या स्वप्नांना व्यासपीठ देणाऱ्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यास दिशा देणाऱ्या महत्त्वपूर्ण पावलांची सुरुवात ठरत आहेत.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!