भद्रावती (प्रतिनिधी): आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ मध्ये नवे राजकीय समीकरण तयार होत असून, या प्रभागात राकेश खुसपुरे हे प्रभावशाली आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत.
सामाजिक कार्य, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि युवकांशी असलेला सशक्त संपर्क या गुणांच्या बळावर खुसपुरे यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. प्रभागात सर्वत्र तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत असून, “युवकांचे खरे नेतृत्व – राकेश खुसपुरे!” असे घोषवाक्य नागरिकांमध्ये ऐकू येत आहे.
राकेश खुसपुरे यांनी गेल्या काही वर्षांत परिसरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रांत सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे.
“भद्रावती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे आणि जनतेच्या विश्वासास पात्र ठरावे, हेच माझं ध्येय आहे,” असे खुसपुरे यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक ८ मध्ये युवकांच्या पाठिंब्यामुळे निर्माण झालेलं वातावरण लक्षवेधी ठरत असून, राकेश खुसपुरे हे या निवडणुकीत प्रभावी दावेदार म्हणून पुढे येत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.


