- भद्रावती- वरोरा (प्रतिनिधी):-
शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीचे माजी नगरसेवक निष्क्रियांचे तोंड वाजू लागले आहेत.
राजकीय वातावरण तापत असतानाच माजी नगरसेवक पुन्हा मैदानात उतरण्याची हालचाल सुरू झाली आहे.
मात्र नागरिकांकडून आता तीव्र नाराजी आणि थेट प्रश्नांचा पाऊस पडतोय..!
“पाच वर्षांत चेहरा नाही, समस्या सोडविल्या नाहीत, आता मत मागायला कशावरून आलात?”
भद्रावतीतील अनेक वॉर्डांत गेल्या पाच वर्षांत ठोस विकासकामे झाली नाहीत.
गावठाणात पाण्याचा प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, अंधारे वॉर्ड, नाल्यांची दुर्दशा
सर्वत्र नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या, पण कोणीही कानाडोळा केला नाही.
माजी नगरसेवक केवळ निवडणुकीच्या काळातच जनतेकडे येतात,
बाकीच्या काळात त्यांच्या दर्शनालाही नागरिक मुकले आहेत.
शहरातील नागरिक आता स्पष्टपणे सांगतात
“आम्हाला आता चेहऱ्यांवर नव्हे, कामावर विश्वास आहे!
पाच वर्षे जनता विसरणारे आणि निवडणूक आली की अचानक कार्यकर्ते बनणारे आम्हाला नकोत.”
वॉर्डातील युवक, महिला गट आणि नागरिक संघटना आता सज्ज झाले आहेत.
ते म्हणतात
“या वेळेस शिक्षित, तरुण आणि जनतेत मिळणारे उमेदवार हवेत.
जुन्या, निष्क्रिय आणि केवळ प्रचारपुरते सक्रिय नेते हवे नाहीत!”
भद्रावतीतील राजकीय समीकरणे यामुळे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नव्या चेहऱ्यांबाबत उत्सुकता वाढली असून मतदारांमध्ये जागरूकतेची नवी लाट उसळली आहे.
जनतेचा सूर एकच
“विकास हवे, दिखावा नको!”
- रस्त्यावरील झाडे अपघातांचे कारण;प्रशासनाचे दुर्लक्ष..!
- नामुचा “डल्ला” ठेकेदार-दारू विक्रेत्यांकडून “उत्साह” चा “फंड”..!
- भद्रावती आंबेडकरी राजकारणात संभ्रम; बी.एस.पी. व वंचित बहुजन आघाडीची भूमिका अस्पष्ट
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- पदवीधर मतदारसंघात नाम्याचा “डल्ल्यामुळे” कार्यकर्त्यांत नाराजी..! पक्षीय गडबडीत : नाम्याचा, टक…टक…टक..टक! ‘डल्ला’!
- विस वर्षांनंतर लोकमान्य विद्यालयाच्या वर्गमित्रांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ
- जुन्या कार्यकर्त्यांना डावलून स्वयंघोषित नाम्यांच्या “डल्ला” प्रकरणावर नारीशक्तीने ठोस निषेध..
- भद्रावतीतील नाम्याचा राजकीय विस्फोट…! ज्येष्ठांचा विश्वासघात, अवैध व्यवसायांचा आधार, आणि पक्षांतर्गत वाढते वाद..! नाम्याचा “डल्ला” ..! स्वयंघोषित नेतृत्वाने भद्रावतीत वादांचा वाढता पाऊस…
- भद्रावती नगरपरिषद निवडणूक; प्रभाग ७ मध्ये इम्रान खान हे संभाव्य नगरसेवक म्हणून चर्चेत…!
- “त्या” पक्षातील पारदर्शकतेवर जुन्या निष्ठावंतांचा भडकता ऐल्गार..! नाम्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह..!


