स्वप्निल डांगे यांचा रोखठोक सवाल..?
भद्रावती:- (प्रतीनीधी):- “पंधरा वर्षे पक्षासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. प्रत्येक मोहिम, प्रत्येक बूथवर काम केले. तरी स्थान नाही! पण दोन दिवसांचा ‘डल्ला’ मारणारे पुढे..! हे न्याय आहे का?”
असा रोखठोक सवाल भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते स्वप्निल डांगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला.
डांगे यांनी गेली १५ वर्षे पक्षप्रसार आणि जनसेवा हेच ध्येय ठेवले.
बूथ स्तरावर संघटन उभं केलं, प्रत्येक आदेश पार पाडला, मोहिमांमध्ये आघाडी घेतली पण निर्णयप्रक्रियेत मात्र त्यांचं नाव कायम मागेच!
“हेच खरं गुप्त राजकारण आहे! मेहनत घेणारे मागे आणि ‘डल्ला’ मारणारे पुढे हा प्रकार आता उघडच झालाय,” असे डांगे म्हणाले.
त्यांनी सांगितले, “प्रभाग ९ मधील प्रत्येक बूथची मला नाडी ठाऊक आहे.
कार्यकर्त्यांशी नातं, जनतेत ओळख आणि संघटनकौशल्य माझं बलस्थान आहे. पण निर्णय घेतात ते जे कार्यकर्त्यांच्या श्रमावर गादी सजवतात!”
स्थान न मिळूनही डांगे यांनी निष्ठा सोडली नाही.
ते ठामपणे म्हणाले
“पक्ष माझं घर आहे. प्रभाग ९
मध्ये माझा पक्षाचा झेंडा
फडकवणारच!”…
डांगे यांच्या या वक्तव्यानंतर पक्षातील “डल्ला राजकारणावर” चर्चा रंगली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार
“निष्ठा विकत घेता येत नाही;
ती कमवावी लागते!”
✍️ संपादकीय ठोका
पक्षात जर “दोन दिवसांचा डल्ला” पुढे आणि “पंधरा वर्षांची निष्ठा” मागे राहिली,
तर संघटना फक्त नावापुरती राहील!
स्वप्निल डांगेसारख्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला नाही, तर पक्षाचे नुकसान अटळ आहे.


