Friday, June 5, 2026
Homeचंद्रपूरनिस्वार्थ रुग्णसेवा, समाजकारण आणि ग्रामविकासाला वाहिलेले आयुष्य; नागभीड तालुक्यात शोककळा

निस्वार्थ रुग्णसेवा, समाजकारण आणि ग्रामविकासाला वाहिलेले आयुष्य; नागभीड तालुक्यात शोककळा

श्रीगुरूदेव भक्त, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन

नागभीड प्रतिनिधी :-

वंदनीय संत यांच्या सान्निध्यात बालपण व्यतीत झालेले, त्यांच्या विचारांचा वारसा आयुष्यभर जपणारे, नवेगाव पांडव येथील माजी सरपंच तसेच श्रीगुरूदेव सेवा छात्रालयाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वैद्यकीय सेवक डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे गुरुवार, दि. ४ जून रोजी सायंकाळी अल्प आजाराने दुःखद निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.

डॉ. बोरकुटे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा, समाजसेवा आणि ग्रामविकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मानवसेवा, ग्रामगीता आणि समाजप्रबोधनाच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. त्यामुळे नागभीड तालुक्यासह परिसरात त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते.

गत दोन दिवसांपूर्वी त्यांना नागपूर येथील रुग्णालयातून उपचारानंतर घरी आणण्यात आले होते. त्यांच्या पश्चात ज्ञानेश्वर व कुणाल ही मुले, सुना, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नागभीड तालुक्यासह परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन अंत्यदर्शन घेतले व शोकसंवेदना व्यक्त केल्या.

त्यांच्यावर आज, शुक्रवार दि. ५ जून रोजी सकाळी ११ वाजता नवेगाव पांडव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!