“उमेदवारी हरली, लढाई नाही..
रोख-ठोक ..प्रतीक्रिया
“उमेदवारी हरली, लढाई नाही..
भद्रावती:- राजकारणात उमेदवारी मिळाली नाही तर नाराजी, राग किंवा माघार घेणारे अनेक नेते आणि कार्यकर्ते आपल्याला दिसतात.
पण भाजपाचे कार्यकर्ता इम्रान खान यांनी आपल्या वेगळ्या विचारसरणीने भद्रावतीत एक नवीन उदाहरण निर्माण केले आहे.
पक्षाची उमेदवारी न मिळाल्यानंतरही त्यांनी खचून न जाता, उलट जनतेशी आपले नाते अधिक दृढ केले आहे.
इम्रान खान यांनी मतदार बंधू-भगिनींना दिलेल्या भावनिक संदेशात स्पष्टपणे सांगितले,
“मी विचलित झालो नाही, कारण माझी निष्ठा कोणत्याही पदावर किंवा तिकीटावर अवलंबून नाही. आजही मी भाजपाचा आहे… आणि पुढेही राहणार आहे. माझ्यासाठी भाजपा हा विचार आहे, संस्कार आहे आणि कर्तव्य आहे.”
त्यांनी आपल्या मनातील वेदनाही स्पष्टपणे बोलून दाखवली. “माझ्या प्रभागात एका विशिष्ट समाजाचे मतदान जास्त असल्याने उमेदवारी नाकारली गेली…
ही खंत मी जगत असेपर्यंत विसरणार नाही.” तरीही, सेवा थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ते ठामपणे सांगतात.
“उमेदवारी मिळाली म्हणूनच काम करायचं, आणि मिळाली नाही म्हणून सोडायचं… असा मी नाही.
तुमच्या आशा, अपेक्षा आणि प्रेमासाठी मी सदैव वचनबद्ध आहे.”
पक्षाप्रती आपली निष्ठा पुन्हा स्पष्ट करत त्यांनी म्हटले, “भाजपाच्या ध्येयधोरणांवर माझा दृढ विश्वास आहे.
तुमचा पाठिंबा आणि पक्षाची विचारधारा यांच्या बळावर मी लोकसेवा अधिक ताकदीने करत राहणार आहे.”
मतदारांसोबत राहण्याचे आवाहन करत ते म्हणाले,
“मी तुमचा आवाज आहे. पद नसले तरी सेवा थांबत नाही. मी तुमचा आणि पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून नेहमीच उभा राहीन.”
त्यांच्या या भावनिक आणि थेट मनोगतातून एकच गोष्ट प्रसारमाध्यमातून जाणवते उमेदवारी हरली, पण लोकसेवेची लढाई नाही. आपला जनसेवक, इम्रान खान यांनी दिलेला हा संदेश भद्रावतीतील राजकीय वातावरणात एक नवीन चर्चा निर्माण केली आहे.
इम्रान खान यांच्या या भूमिकेमुळे अनेक तरुण कार्यकर्ते आणि नागरिकांना आशा आणि प्रेरणा मिळाली आहे.
त्यांच्या विचारांमुळे राजकारणातील निष्ठा, सेवा आणि जनतेशी असलेले नाते यांचा महत्त्वाचा संदेश दिसून येतो. भद्रावतीतील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या या भूमिकेचे विशेष स्वागत झाले आहे.
इम्रान खान यांचेल मत..!
उमेदवारी नाकारली, तरी लोकसेवा थांबली नाही.
“नाही नगरसेवक; जनसेवक म्हणून काम करणार,
“उमेदवारी हरली, लढाई नाही..
“भाजपाचा विचार, संस्कार आणि कर्तव्य.


