Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूर“उमेदवारी नाकारली… आणि कार्यकर्त्यांचा गाजलेला बंडाचा आवाज!”

“उमेदवारी नाकारली… आणि कार्यकर्त्यांचा गाजलेला बंडाचा आवाज!”

भद्रावती..!
या निवडणुकीचा सर्वात मोठा राजकीय स्फोट उमेदवार जिंकले किंवा हरले म्हणून नाही…
तर उमेदवारीच नाकारलेल्या कार्यकर्त्यांनी पेटलेल्या ज्वालामुखीमुळे झाला आहे.

पक्ष कोणताही असो
सभेच्या पाठीशी उभे तेच,
पोस्टर-झेंडे लावणारे तेच,
मतदारांना मनवणारे तेच,
पण निर्णायक क्षणी?
उमेदवारी मात्र वरून आलेल्या “अदृश्य आदेशाने” कापले जातात.

आणि यंदा?
ही नाराजी इतक्या टोकाला गेली की कार्यकर्ते थेट बोलू लागले

 

संवाद-आधारित भाग

कार्यकर्ता १ :
“माझं कागदपत्र एकही दोष नसलेलं… तरी अर्ज कसा नाकारला?”

कार्यकर्ता २:
“निष्ठेपेक्षा ‘लॉबिंग’ आणि ‘खासगी गाठी’ मोठ्या झाल्यात! काम करणाऱ्याला नाही,
काम पूर्ण करुन घेणाऱ्यांना उमेदवारी!”

कार्यकर्ता ४:
“खरंच सांगायचं तर… आम्ही उमेदवारी नाकारली नाही,
आम्हाला उमेदवारी पाडण्यात आली!”

कार्यकर्ता ५ (थेट रोखठोक) :
“पक्षांना आम्ही फक्त ढकलण्यापुरते कार्यकर्ते पाहिजे.
पद? ते त्यांच्या खिशातल्या मोजक्या लोकांसाठी!”

कार्यकर्ता.. ५
“ही नाकारलेली उमेदवारी नाही…
ही वर्षानुवर्षे केलेल्या प्रामाणिक परिश्रमाची सार्वजनिक थट्टा आहे!”

 

स्फोटक संपादकीय कट्टा : ‘नाकारले तरी उठणारा कार्यकर्ता’

संपादकीय प्रश्न स्पष्ट आहे
आज महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा अन्याय म्हणजे
“कार्यकर्त्यांच्या पात्रतेपेक्षा एका फोन कॉलची किंमत जास्त असणं.”

पक्ष बदलले, नेते बदलले, चेहरे बदलले…
पण व्यवस्था मात्र बदलली नाही.

उमेदवारी अर्ज नाकारलेले हे कार्यकर्ते
पराभूत नाहीत…
ते तर नव्या लढाईचे शिल्पकार ठरू शकतात.

इतिहास सांगतो
नाकारलेलेच कार्यकर्ते पुढे
वंचितांच्या, सामान्य नागरिकांच्या आणि स्वतःच्या अधिकाराच्या लढाईचे नेते बनले.

आज महाराष्ट्रभर जळत असलेली नाराजी ही हार नाही…
ही “नवं नेतृत्व जन्माला येण्याची” चिन्हं आहेत.

 

शेवटचा झणझणीत संदेश

“उमेदवारी कापणाऱ्यांची किती वर्षांची…

पण अन्याय सहन न करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज पिढ्यानपिढ्या ऐकू येतो.”

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!