भद्रावती (प्रतिनिधी):-l
निवडणुकीच्या तोंडावर प्रभागात महिला उमेदवारांची रेलचेल दिसत असली, तरी नागरिकांच्या नजरा एक वेगळंच चित्र पकडत आहेत. पोस्टरवर स्त्री सक्षमीकरणाचे चमचमीत दावे, पण प्रत्यक्षात उमेदवारीपासून ते प्रचारापर्यंत सर्व निर्णयांची चावी अजूनही शासकीय-निमशासकीय नौकरीवाल्या नवऱ्याच्याच खिशात!
दिवसा सरकारी ऑफिसात फाईल हलवणारे हे नवरे,
संध्याकाळी प्रभागात बायकोच्या प्रचाराची फाईल हलवू लागतात.
काहींची तर स्थिती अशी,
“सकाळी सरकारी आदेश,
संध्याकाळी प्रचाराचे आदेश!”
नागरिकांची मजेदार प्रतिक्रिया
“बॅनर बाईचा, विचार नवऱ्याचा!”
“महिला सक्षमीकरण कुठे? अजूनही ‘नवरा-पावर’ उमेदवारीच!”
प्रचारातही मजेशीर दृश्य..!
बाई उमेदवार शांत उभी,
आणि बाजूला नौकरीवाल्या नवऱ्याचे सतत चालणारे निर्देश :
“हे बोला… तिथे जा… फोटो काढा… हा मुद्दा सांगा…!”
काही मतदारांनी तर थेट प्रश्न उचलला,
“उमेदवार खरी बाई आहे का तिचा नौकरीवाला नवरा?”
सोशल मीडियावरही चिमटे सुरू
“स्त्री सक्षमीकरणाच्या पोस्टरला लाईक द्या,
आणि नवरा-राजच्या व्यवस्थापनाला सलाम करा!”
अनेक महिलांना उभं करणं हे स्वागतार्ह पाऊल असलं, तरी
स्त्री शक्तीचा नारा देताना मागून रिमोट नवऱ्याच्या हातातच ठेवणं,
ही काळाची गंमत की राजकारणाची सवय?
मतदारांचे तिखट मत
“खरे सक्षमीकरण तेच… ज्यात महिला उमेदवार स्वतः निर्णय घेते.
फक्त फोटो बदलल्याने राजकारण बदलत नाही!”


