Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूरसेवा, अनुभव आणि प्रचाराची धडाकेबाजी; वडगावात भाजप “फुल फॉर्म”मध्ये!

सेवा, अनुभव आणि प्रचाराची धडाकेबाजी; वडगावात भाजप “फुल फॉर्म”मध्ये!

चंद्रपूर न्यूज डेस्क..

चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२५..२६ च्या रणधुमाळीत वडगाव प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार चांगलाच वेग पकडताना दिसत आहे. गल्लीगल्लीत चर्चा कमी आणि “यावेळी भाजपच” हा आत्मविश्वास जास्त ऐकू येत आहे

कमळ या चिन्हावर लढणाऱ्या भाजपच्या अधिकृत पॅनलमध्ये माजी महापौर सौ. राखी कंचलावार, सामाजिक कामातून पुढे आलेल्या सौ. सोनल प्रकाश देवतळे, अनुभवी माजी नगरसेवक श्री. देवानंद वाढई आणि ओबीसी समाजाचा आवाज असलेले श्री. सत्यम गाणार यांचा समावेश आहे. म्हणजे अनुभव, सेवा आणि ओळख सगळं एका पॅनलमध्ये एकवटलेलं आहे.

विशेषतः सौ. सोनल प्रकाश देवतळे या वडगाव प्रभागात केवळ उमेदवार म्हणून नाही, तर काम करणारी जनसेविका म्हणून ओळखल्या जात आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण तसेच महिला व युवकांच्या प्रश्नांवर त्यांनी सामाजिक कामाच्या माध्यमातून प्रत्यक्ष काम केले आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान अनेक मतदार अभिमानाने सांगताना दिसतात
“हे नाव नवीन नाही, काम जुनेच आहे!”

सौ. सोनल देवतळे यांचा साधेपणा, थेट संवाद आणि प्रश्न सोडवण्याची तयारी यामुळे महिला, युवक आणि सामान्य कुटुंबांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आपुलकी दिसून येत आहे. प्रचार फेऱ्यांमध्ये त्या केवळ आश्वासनं देत नाहीत, तर आधी केलेल्या कामाचा विश्वास लोकांसमोर ठेवतात.

माजी महापौर सौ. राखी कंचलावार यांचा प्रशासकीय अनुभव, देवानंद वाढई यांची प्रभागातील मजबूत पकड आणि सत्यम गाणार यांचा समाजाशी थेट संपर्क यामुळे भाजपचा प्रचार अधिक बळकट झाला आहे. कार्यकर्ते आत्मविश्वासाने सांगतात
“आमच्याकडे भाषण नाही, फाईल नाही… थेट कामाची यादी आहे!”

घरोघरी भेटी, चौकात चर्चा आणि चहाच्या टपरीवर विश्लेषण सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे,
“इतकं कामाचं आणि विश्वासाचं पॅनल असेल, तर प्रचार आपोआपच जोरात होणार!”

एकंदरीत काय,
वडगाव प्रभागात
मतदारांच्या चेहऱ्यावर विश्वास,
कार्यकर्त्यांत आत्मविश्वास
आणि विजयाची चर्चा सर्वत्र
असं चित्र सध्या दिसत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!