Friday, June 5, 2026
Homeभद्रावतीभद्रावतीत हातभट्टी दारूविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच; अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ

भद्रावतीत हातभट्टी दारूविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच; अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ

भद्रावतीत अवैध हातभट्टी दारूविरोधात धाडसत्र सुरूच; पोलिसांचा धडाकेबाज ॲक्शन मोड..

अवैध दारूविरोधात पोलिसांची मोहीम तीव्र; संशयित अड्ड्यांवर करडी नजर

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

भद्रावती शहर व परिसरात अवैध हातभट्टी दारूच्या व्यवसायाविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून विविध भागांमध्ये धाडसत्र सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. भंगाराम वार्ड, डोलारा तसेच इतर संवेदनशील भागांमध्ये संशयित ठिकाणांवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून वाढलेल्या हालचालींमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

शहरातील विविध भागांतून हातभट्टी दारू विक्रीबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने पोलिसांनी सतर्क भूमिका घेतली आहे. माहिती संकलन, गुप्त पडताळणी, तपासणी मोहीम आणि संशयित हालचालींवर लक्ष ठेवून अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी प्रभावी पावले उचलली जात आहेत.

हातभट्टी दारूमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याबरोबरच शासनाचा मोठ्या प्रमाणावर अबकारी महसूलही बुडत असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे.

महिला व नागरिकांनी अवैध दारू विक्रीमुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची खंत व्यक्त केली असून अशा अड्ड्यांचे समूळ उच्चाटन करण्याची मागणी केली आहे.

धाडसत्रामुळे अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ

सध्या सुरू असलेल्या कारवाया, वाढलेली पोलिस गस्त आणि सततची देखरेख यामुळे अवैध हातभट्टी दारू व्यवसायाशी संबंधित घटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पोलिसांच्या वाढत्या हालचालींमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून संशयित अड्ड्यांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे.

अवैध दारूमुळे शासनाचा महसूल बुडण्यासह नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत असल्याने पोलिसांनी या प्रकाराविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. समाजहितासाठी सुरू असलेल्या या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत असून अवैध दारूमुक्त भद्रावतीसाठी पोलिसांच्या प्रयत्नांचे कौतुक केले जात आहे.

भद्रावती पोलिसांनी अवैध हातभट्टी दारूविरोधात छेडलेल्या मोहिमेकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!