Friday, July 31, 2026
Homeभद्रावतीइम्रान खान यांच्या पाठपुराव्याला यश; अखेर बिबट्या जेरबंद!

इम्रान खान यांच्या पाठपुराव्याला यश; अखेर बिबट्या जेरबंद!

इम्रान खान यांच्या पाठपुराव्याला यश; अखेर बिबट्या जेरबंद!

रोखठोक वृत्ताची दखल; वन विभागाची तातडीची कारवाई, नागरिकांना मोठा दिलासा

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

Shankar Borghare 95 52 61 25 55

भद्रावती शहरालगत स्मशानभूमी रोड परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर भाजयुमो प्रदेश सचिव इम्रान खान यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी धानकुटे यांच्याशी तातडीने संपर्क साधून पिंजरा लावण्याची आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर वन विभागाने संबंधित परिसरात पिंजरा लावला आणि अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळाले.

यापूर्वी बिबट्याने भाऊराव धुळे यांच्या तीन बकऱ्यांवर हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्मशानभूमी रोडवरून शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांची दररोज ये-जा होत असल्याने नागरिकांनी तातडीच्या कारवाईची मागणी केली होती.

या गंभीर प्रश्नावर रोखठोक न्यूजनेही सविस्तर वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर वन विभागाने तातडीने हालचाल करत पिंजरा उभारला आणि काही तासांतच बिबट्या पिंजऱ्यात अडकला.

बिबट्या जेरबंद झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, इम्रान खान यांच्या पाठपुराव्यामुळे आणि वन विभागाच्या त्वरित कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. भविष्यातही अशा संवेदनशील भागात नियमित गस्त, पिंजरे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!