Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरभावाच्या मृत्यू प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या अनुप यादव यांना धमकी दिल्याचा आरोप

भावाच्या मृत्यू प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या अनुप यादव यांना धमकी दिल्याचा आरोप

सख्या भावाचा मृत्यू प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या अनुप यादव यांना धमकी दिल्याचा आरोप

पोलिस कर्मचारी किशोर वाकाटे यांच्याविरोधात रामनगर पोलिसांत तक्रार; सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी

चंद्रपूर ,न्यूज डेस्क,  शंकर बोरघरे, 95 52 61 25 55

भावाच्या मृत्यू प्रकरणाची सत्य परिस्थिती समोर यावी, यासाठी पाठपुरावा करणाऱ्या अनुप चंद्रपाल यादव यांनी आपल्याला धमकी दिली जात असल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीत पोलिस कर्मचारी किशोर वाकाटे यांच्याविरोधात चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अनुप यादव यांनी ८ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या तक्रार अर्जानुसार, त्यांचे भाऊ स्व. दिलीप चंद्रपाल यादव यांच्या मृत्यू प्रकरणाचा ते कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करीत आहेत. या प्रकरणाची सत्य परिस्थिती समोर यावी आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

तक्रारीनुसार, त्यांच्या भावाने मृत्यूपूर्वी किशोर वाकाटे यांच्याकडून त्रास होत असल्याचे सांगितले होते. तसेच काही व्यक्तींच्या माध्यमातून अडचणी निर्माण केल्या जात असल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अनुप यादव यांनी केली आहे.

तक्रारीत रामजी यादव यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत धमकी पोहोचविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ८ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता चंद्रपूर शहरातील बसस्थानक परिसरातील गिरीराज हॉटेलसमोर रामजी यादव यांची भेट झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी अनुप यादव यांचे मित्र राजू कुकडे हेही उपस्थित असल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेचा प्रत्यक्ष घटनाक्रम स्पष्ट होण्यासाठी गिरीराज हॉटेल परिसर, बसस्थानक परिसर तसेच आजूबाजूच्या दुकाने व इमारतींमधील सीसीटीव्ही फुटेज जतन करून तपासण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच राजू कुकडे यांचा जबाब नोंदविण्यात यावा, अशीही मागणी तक्रारदाराने केली आहे.

भावाच्या मृत्यू प्रकरणाचा पाठपुरावा करीत असल्याने आपल्यावर दबाव किंवा धमकी आणली जाऊ शकते, अशी भीती अनुप यादव यांनी व्यक्त केली आहे. स्वतःसह कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित व्यक्ती पोलिस विभागातील कर्मचारी असल्याने या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. तसेच किशोर वाकाटे यांची चंद्रपूर शहराबाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणीही तक्रार अर्जातून करण्यात आली आहे.

या तक्रारीच्या प्रती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याचे तक्रार अर्जात नमूद आहे.

दरम्यान, तक्रारदाराने केलेले आरोप हे तक्रारीतील दावे असून त्यांची सत्यता पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार रामनगर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या तक्रारीवर पोलिस प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!