Monday, October 26, 2026
Homeभद्रावतीतालुक्यातील बेकायदेशीर दारूविक्रीवर पोलिसांचा धडाका; नियमभंग करणाऱ्या बारवर कारवाई कधी?

तालुक्यातील बेकायदेशीर दारूविक्रीवर पोलिसांचा धडाका; नियमभंग करणाऱ्या बारवर कारवाई कधी?

तालुक्यात देशी, वीदेशी दारूविक्रीवर पोलिसांचा धडाका; मग राज्य उत्पादन शुल्क विभाग कुठे?

पोलिसांची कारवाई सुरूच; सकाळीच बार सुरू होत असल्याने वेळेच्या नियमांवरही सवाल

भद्रावती, न्यूज डेस्क 

शंकर बोरघरे, 95 52 61 25 55

भद्रावती तालुक्यातील बेकायदेशीर देशी, विदेशी दारूविक्रीविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर वचक निर्माण झाला असून, नागरिकांकडून पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत होत आहे.

मात्र, पोलिसांनाच बेकायदेशीर दारूविक्रीवर कारवाई करावी लागत असेल, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी काय? असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे.

दुसरीकडे काही बार भद्रावती तालुक्यातील  सकाळपासून  पण सुरू होत असल्याची चर्चा आहे. दारूविक्रीची निर्धारित वेळ पाळली जाते की नाही, याची तपासणी कोण करणार? नियमांचे उल्लंघन होत असेल तर संबंधितांवर कारवाई का होत नाही? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

पोलिस कारवाई करत आहेत, हे निश्चितच कौतुकास्पद आहे; मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागानेही केवळ कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून बारच्या वेळांची तपासणी करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

पोलिसांचा धडाका कायम; आता उत्पादन शुल्क विभागाची कारवाई कधी?

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!