फॉर्च्युनरमध्ये दारूचा ‘शाही’ साठा; पोलिसांचा छापा अन् चेतन पारेकरची धूम!
किल्ला वॉर्डात पोलिसांची धडक कारवाई; विदेशी दारूसह २५ लाखांची फॉर्च्युनर जप्त
भद्रावती, न्यूज डेस्क
शंकर बोरघरे.95 52 61 25 55
भद्रावती शहरातील किल्ला वॉर्ड परिसरात विदेशी दारूच्या बेकायदेशीर अवैध साठ्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत विदेशी दारूसह तब्बल २५ लाख रुपये किमतीची टोयोटा फॉर्च्युनर जप्त करण्यात आली. दारू आणि वाहन मिळून २५ लाख ३८ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
२ ऑक्टोबर २०२६ रोजी भद्रावती पोलीस पथक शहर परिसरात गस्त घालत असताना किल्ला वॉर्डातील विदेशी दारूच्या बेकायदेशीर दारू विक्रीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर विठ्ठल मंदिराजवळील साधना अशोक वानखेडे (वय ५५) यांच्या घराची पंचांसमक्ष झडती घेण्यात आली.
पोलिस कडून मीळालेल्या माहितीनुसार, घरातील निवासी खोली पलंगाखाली तसेच अंगणात उभ्या असलेल्या टोयोटा फॉर्च्युनर (एमएच २२ एएम ८८५५) ची तपासणी करण्यात आली. यावेळी विविध ब्रँडची विदेशी दारू आढळून आली. जप्त दारूसाठ्याची किंमत ३८ हजार ९४० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांचा छापा अन् एकाची धूम!
कारवाई सुरू असतानाच चेतन पारेकर याने पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्याचा शोध घेतला; मात्र तो हाती लागला नाही.
दरम्यान, ड्राय डेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे किल्ला वॉर्ड परिसरातील कथित अवैध दारूविक्रीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
याप्रकरणी साधना अशोक वानखेडे आणि चेतन पारेकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष केदारे, प्रशांत शेंद्रे, गोपाल आतकुलवार, देवानंद दुकरे आणि मोनाली गरघाटे यांच्या पथकाने केली. पुढील तपास देवानंद दुकरे करीत आहेत.
फॉर्च्युनरमध्ये दारूचा साठा ठेवला; पोलिसांचा छापा पडताच फॉर्च्युनर पोलिसांच्या ताब्यात आणि एक जण अंधारात गायब किल्ला वॉर्डातील या कारवाईची सध्या शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.


