Monday, October 26, 2026
Homeचंद्रपूरवरोऱ्याच्या कनिष्कची यशस्वी भरारी; यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश

वरोऱ्याच्या कनिष्कची यशस्वी भरारी; यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश

 वरोऱ्याच्या कनिष्कची एमबीबीएससाठी बाजी!

पहिल्याच प्रयत्नात प्रथम फेरीत निवड; यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

चंद्रपूर, न्यूज डेस्क , शंकर बोरघरे, 95 52 61 25 55 

वरोरा शहरातील अभ्यंकर वॉर्ड येथील रहिवासी कनिष्क स्मिता संजय पाटील याने वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत यश संपादन केले आहे. त्याची यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी पहिल्याच प्रयत्नात प्रथम फेरीत निवड झाली आहे. या यशामुळे पाटील कुटुंबीयांसह परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वैद्यकीय क्षेत्राकडे वाटचाल करणाऱ्या कनिष्क याच्यासाठी ही निवड महत्त्वाची ठरली आहे. पहिल्याच प्रयत्नात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळवून त्याने आपल्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी भक्कम पाऊल टाकले आहे.

कनिष्क याच्या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वरोऱ्याच्या या सुपुत्राने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यात यशस्वी डॉक्टर बनून समाजाची सेवा करण्यासाठी त्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!