Saturday, June 6, 2026
Homeभद्रावतीभद्रावती तालुक्यातील तांडा गाव सध्या चर्चेत आहे… पण कारण मात्र छानसं बदललंय!

भद्रावती तालुक्यातील तांडा गाव सध्या चर्चेत आहे… पण कारण मात्र छानसं बदललंय!

चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️

एकेकाळी बाहेरचा माणूस गावात आला की सहज विचारायचा
“मोहफुलाची दारू कुठे मिळेल?”
आता मात्र प्रश्नच बदलले आहेत
“कोणता मुलगा एम.ए. झाला?”,
“कोण पदवी-पदव्युत्तर करतोय?”,
आणि “पुढे गावाचं नेतृत्व कोण करणार?”

पूर्वी गावात सकाळ मोहफुलाच्या कामाने सुरू व्हायची,
आता ती कॉलेजच्या बसच्या हॉर्नने सुरू होते.
बाटल्यांची जागा हळूहळू
पुस्तकं, फाईल्स आणि विचारमंथनाने घेतली आहे.

कालपर्यंत हातात गिलास दिसायचा,
आज हातात डिग्रीचं सर्टिफिकेट झळकतंय.
तेव्हा चर्चा हलक्याफुलक्या गप्पांवर असायच्या,
आता चर्चा उच्च शिक्षण, करिअर, नेतृत्व आणि भविष्यावर होताना दिसते.

विशेष म्हणजे तांडा गावातील युवक
उच्च शिक्षणाच्या बळावर आत्मविश्वासाने पुढे येत असून
सामाजिक कामकाज, संघटन आणि नेतृत्वाच्या भूमिकेत सक्रिय होत आहेत.
यामुळे गावाची ओळख आता सकारात्मक बदल आणि प्रगतीशी जोडली जात आहे.

थोडक्यात काय तर..
तांडा गावाने जुन्या ओळखीला मागे टाकत
युवकांच्या उच्च शिक्षणाची आणि प्रगतीची वाट ठामपणे धरली आहे.
आणि हे बदल पाहून गाव स्वतःच हसत म्हणतंय..
“अरे वा… आपलं गाव खरंच पुढे निघालंय!”

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!