Friday, April 17, 2026
Homeभद्रावतीडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सरबत वाटप; सेवाभावातून सामाजिक ऐक्याचा संदेश..! सचिन नारायने..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सरबत वाटप; सेवाभावातून सामाजिक ऐक्याचा संदेश..! सचिन नारायने..

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
Shankar Borghare
95 25 61 25 55

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भद्रावती शहरात सरबत वाटपाचा सेवाभावी उपक्रम उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पार पडला. प्रखर उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देत समता, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा ठोस संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

प्रथमतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सरबत वाटप उपक्रमास सुरुवात करण्यात आली.

भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक आणि वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्य वेचणारे डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भद्रावतीकरांनी सेवा कार्यातून त्यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा प्रयत्न केला.

हा उपक्रम खंबीर युवा नेतृत्व सचिन नारायने यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत उपक्रम यशस्वी करून दाखवला.

यावेळी भद्रावती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रफुल चटकि, उपनगराध्यक्ष सुधीर सातपुते, नगरसेवक सौ. रेखा खुटेमाटे, नगरसेवक पारखीताई, सामाजिक कार्यकर्ते अक्षय मन्ने, विनोद बोरकर, थॉमस दुधे, रामा झांझोटे, पिंटु मरस्कोले आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नागरिकांना सरबत वाटप करण्यात आले.

सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरबत वाटपामुळे उन्हाच्या झळांपासून नागरिकांना दिलासा मिळाला, तर सामाजिक ऐक्याचा संदेश अधिक बळकट झाला.

यावेळी सचिन नारायने म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त केवळ अभिवादन न करता त्यांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या तत्वांना कृतीत उतरवणे हीच खरी आदरांजली आहे.”

उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करत समाजात समता, न्याय आणि बंधुता टिकवण्याचा निर्धार व्यक्त केला.

एकंदरीत, हा उपक्रम केवळ सेवा कार्यापुरता मर्यादित न राहता सामाजिक जागृती, सेवा आणि ऐक्याचा प्रभावी संगम ठरला. भद्रावती शहराने १३५ व्या जयंतीनिमित्त आदर्श निर्माण करत समाजप्रबोधनाचा ठोस संदेश दिला.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!