Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूरउमेदवारीच्या नावावर पक्षनिष्ठेचा घात? निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेतली जाईल का?

उमेदवारीच्या नावावर पक्षनिष्ठेचा घात? निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेतली जाईल का?

उमेदवारीच्या नावावर पक्षनिष्ठेचा घात?

भद्रावती( प्रतीनीधी):- नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी, खरंच योग्य व्यक्तीलाच उमेदवारी मिळणार का? हा प्रश्न आता पक्षातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात घर करून बसला आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी जीव ओतून काम करणाऱ्या, चढ-उतारात साथ देणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या योगदानाची आजही दखल घेतली जाणार का, अशी दबक्या आवाजात चर्चा रंगली आहे.
मात्र, या उमेदवारी प्रक्रियेत एक नवीन चिंता निर्माण झाली आहे. कित्येक वर्षांपासून पिढ्यान्‌पिढ्याआजोबा, पणजोबा, घराण्यातील सर्वांनी पक्ष कधीही डगमगू दिला नाही. चढ-उतारात साथ देणाऱ्या अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या योगदानाची आजही दखल घेतली जाणार का, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
पक्षाला जीव ओतून साथ देणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्यांनाच जर उमेदवारीपासून दूर ठेवले जाणार असेल, तर हा निर्णय कार्यकर्त्यांच्या मनावर मोठा घाव ठरणार हे नक्की. निष्ठा, त्याग आणि वर्षानुवर्षे केलेल्या परिश्रमांचं मूल्यच नसेल तर, उमेदवारी डावलून वरच्या पातळीवर घेतलेले निर्णय पक्षनिष्ठेला घातक ठरू शकतात, अशी चर्चा कार्यकर्त्यांत जोमाने रंगली आहे.
मतदारही या घडामोडींकडे बारकाईने पाहत असून, खऱ्या अर्थाने न्याय देण्याची जबाबदारी आता जनतेच्या न्यायालयावरच येऊन ठेपली आहे.
नगरपरिषद निवडणुकीच्या प्रक्रियेत आर्थिक सक्षमता, जनसंपर्क आणि व्यक्तिमत्त्व यांच्यावर भर दिला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेतली जाईल का, हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!