Saturday, June 6, 2026
Homeचंद्रपूर“सहा हजार घेत गप्प बसणारा नको?” भद्रावतीतील जागरूक मतदार राजाचा प्रसारमाध्यमातून दिलेला...

“सहा हजार घेत गप्प बसणारा नको?” भद्रावतीतील जागरूक मतदार राजाचा प्रसारमाध्यमातून दिलेला सवाल

रोख ठोक आरोप,

सहा हजार घेनारा नगरसेवक नको?” जागरूक मतदाराचा आरोप..!

भद्रावती (प्रतीनीधी):“मूक” नगरसेवकांचा मुद्दा पुन्हा एका जागरूक मतदाराच्या थेट आरोपांनी पुन्हा चर्चेत आला आहे.
नगर परिषदेत निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नांवर तटस्थ आणि गप्प भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप या मतदाराने केला आहे.
त्यांनी म्हणाले की, “सहा हजार रुपयांचे मासिक महीणा घेत बसणारे नगरसेवक नकोत; पंचायतीत आवाज उठवणारे आणि जनतेचे हित पुढे ठेवणारे प्रतिनिधीच निवडा!” या खुलास्यानंतर भद्रावती राजकारणात या विषयावर नवीनच वादळ उठले आहे.
मतदार राज एक फोन करतो,
ते फोन द्वारे रोखठोक माहीतीत म्हणाले की, भद्रावती नगर परिषदेत गेल्या काही वर्षांत अनेक नगरसेवक फक्त बैठकीत हजेरी दाखवून गप्प आहेत, जनतेचे प्रश्न मांडण्यापासून ते लाजत आहेत. त्यांचा असा निषेध आहे की, “कोणताही नगरसेवक जनतेच्या समस्या धाडसाने मांडत नाही. यामुळे भद्रावतीचा विकास थांबला आहे. फक्त त्यांना महीणा दिला जातो तो कशाचा असे त्यांनी स्पष्ट बोलून दाखविले अशा गप्प बसणाऱ्या नगरसेवकांवर करदात्यांचे भार वाढतो.” हे मतदारांचे प्रखर स्वर ऐकून स्थानीय राजकारणात निष्क्रीय नगरसेवकांविरोधात लोकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे.
मतदार राजाचं आवाहन आहे की, नगरपरिषदेत आवाज उठवणारे, प्रत्युत्तर देणारे, गैरव्यवहारांना विरोध करणारे लढवय्ये नगरसेवक निवडा. “ज्यांनी केवळ मानधनासाठी गप्प बसून काम केले नाही, अशा नगरसेवकांनी पुन्हा परत यायचेच नाही!” असा कटाक्ष त्यांनी केला आहे.
भद्रावतीमध्ये येत्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आरोपांनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात केली आहे. माध्यमातून दिलेल्या, या वक्तव्यामुळे काही जागतिकार नगरसेवकांवर दबाव येण्याची शक्यता असून, राजकीय पक्षांची निवड प्रक्रिया आणि उमेदवारांची निवड यावरही याचा परिणाम होऊ शकतो.
मतदारांच्या स्वच्छ नेतृत्वाकडेच्या अपेक्षेत वाढ झाली असून, अधिक सक्रिय आणि जबाबदार नगरसेवकांची मागणी वाढली आहे.
भद्रावतीची लोकसंख्या जलद वाढते असतानाही अनेक प्रश्न अधिराज्य गाठल्याचा दावा मतदारांनी केला आहे. ते म्हणतात की, सुरक्षा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि आवश्यक नागरी सुविधांवर नगरसेवकांनी योग्य प्रगती केली नाही.
त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत जनतेच्या हक्कांचा जोरदार आवाज धरून निराकारण
करणार्या नगरसेवकांना प्राधान्य द्यावे असे मत राजकीय तज्ज्ञांचाही आपले मत व्यक्त केले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!