Tuesday, April 21, 2026
Homeभद्रावतीशास्त्री नगरातील चेंबर समस्येवर नागरिकांचा संताप उसळला…! जबाबदार कोण?

शास्त्री नगरातील चेंबर समस्येवर नागरिकांचा संताप उसळला…! जबाबदार कोण?

शास्त्री नगरातील चेंबर समस्येवर नागरिकांचा संताप उसळला…!
जबाबदार कोण?

भद्रावती (प्रतिनिधी):-
शहरातील शास्त्री नगर परिसरात तुटलेल्या आणि झाकण नसलेल्या चेंबरचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे. रस्त्यामध्ये उघडी पडलेली, फुटलेली व रखडलेली चेंबर दुरुस्त करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत असल्याची तक्रार नागरिकांकडून तीव्र स्वरूपात होत आहे.
या भागात असे एक-दोन नव्हे तर असंख्य चेंबर खराब अवस्थेत, झाकणांशिवाय खुल्या पडलेल्या स्थितीत असल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे लहान मुले, महिलांबरोबरच वाहनधारकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.
नुकत्याच समोर आलेल्या एका संदेशात नागरिकांनी थेट सवाल उपस्थित केला…!
“चेंबर तुटलं…! पण जबाबदारी कोण घेणार?”
यावेळी सुध्न नागरिक पुढे सांगतात..!
“शास्त्री नगरात डझनभर चेंबर तुटलेली, खाली कोसळलेली किंवा झाकण नसलेली अवस्थेत आहेत. अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण?”
दरम्यान, या गंभीर समस्येबाबत नगर परिषद प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई न केल्यामुळे रोष वाढत असून रहिवाशांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.
येथील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळेस अनेकदा वाहनं अडखळतात, पादचारी पडतात आणि मुलांना उघड्या चेंबरची कल्पनादेखील नसते. परिस्थिती बिकट असून कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
तसेच नागरिकांची मागणी स्पष्ट…!तुटलेली व उघडी चेंबर तात्काळ दुरुस्त करा, परिसरातील सर्व चेंबरची तपासणी करून सुरक्षित झाकण बसवा, प्रशासनाने जबाबदारी निश्चित करावी
शहरातील वाढत्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये रोष उसळला असून, प्रशासनाने याकडे गंभीरतेने पाहून तातडीची पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.

“To be continued”..!

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!