Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूरराजकीय भूचाल! पारंपरिक नेते संकटात, “सतरंजी उचलणारे” कार्यकर्ते विजयी होणार का?

राजकीय भूचाल! पारंपरिक नेते संकटात, “सतरंजी उचलणारे” कार्यकर्ते विजयी होणार का?

राजकीय भूचाल! पारंपरिक नेते संकटात, “सतरंजी उचलणारे” कार्यकर्ते विजयी होणार का?

भद्रावती (प्रतिनिधी):- येत्या नगरपरिषद निवडणुकीत शहराचे राजकारण धगधगत असून, पारंपरिक नेते आता आधीच्या सारखे स्थिर नाहीत.
शहरात चर्चा सुरू आहे की, यंदा काही “सतरंजी उचलणारे” कार्यकर्ते राजकीय नवा अध्याय लिहू शकतात.
स्थानिक कार्यकर्त्यांचा विश्वास आणि पसंती मिळवणे उमेदवारांसाठी निर्णायक ठरणार आहे.
प्रसंगी “ज्या”कार्यकर्त्यां योग्य स्थान मिळाले नाही, त्यांचे समर्थन कमी होऊ शकते, अशी संकेत स्थिर पक्षीय सूत्राकडून माहीती मिळत आहेत.
भद्रावतीच्या विविध भागांत प्रचार जोरात सुरू आहे.
उमेदवार प्रत्यक्ष भेटी, सभा व संवादातून मतदारांशी थेट संपर्क साधत आहेत.
शिवसेनेचे (शिंदे गट) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रफुल चटकी यांचे प्रचार मोहीम जोरात असून भद्रावतीकरांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचे स्थानिक राजकीय विश्लेषकाकडून माहीती प्राप्त होत आहे..!
मतदार आता विकास, कामगिरी आणि स्थिर प्रशासनावर भर देत आहेत, तर “राजकीय बेडूक उड्या मारणारे” नेते मागे पडण्याच्या मार्गावर आहेत.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत उमेदवारांपेक्षा कार्यकर्त्यांचा निर्णय आणि स्थानिक लोकांच्या अपेक्षा अधिक प्रभावी ठरणार आहेत. यंदा कोण टिकेल, कोण विजयी होईल,
हे पाहणे संपूर्ण शहरासाठी रोमांचक आणि चर्चेत राहणारे ठरणार आहे.
भद्रावतीकरांनो, ही निवडणूक केवळ उमेदवारांची नव्हे, तर शहराच्या भवितव्याची लढाई आहे!

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!