Saturday, June 6, 2026
Homeभद्रावती१८ दिवसांची मोठी धाकधूक; उमेदवारांची झोप उडाली”

१८ दिवसांची मोठी धाकधूक; उमेदवारांची झोप उडाली”

“निकाल आज नाही तर … थेट २१ डिसेंबरला!

भद्रावती (प्रतिनिधी):-नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागणार होता; मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे निकाल थेट २१ डिसेंबरला ढकलण्यात आला.
या निर्णयाने भद्रावतीत मोठी खळबळ उडाली असून उमेदवारांच्या उत्साहात सरळ चिंतेची भर पडली आहे.
आजचे सर्व कार्यक्रम, सेलिब्रेशन आणि तयारी कोलमडली.
काही उमेदवार सकाळपासून विजय-तयारी करणार तर अचानक काल मतदान दिवशी ; आदेश येताच सर्वांचे चेहरे थेट खाली पडले.
निकाल १८ दिवस पुढे गेल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि प्रतिस्पर्धी पक्षांत मोठी धाकधूक निर्माण झाली आहे.
स्ट्राँग रूमवर आता १८ दिवस अतिरिक्त लक्ष ठेवावे लागणार असल्याने अनेक उमेदवार तणावात आले आहेत.
विरोधी पक्षांमध्ये ही प्रतीक्षा अधिकच जड जात असल्याचे दिसत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण निकालानुसार काही नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका रद्द झाल्यानंतर त्या २० डिसेंबरला होणार असून लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे २१ डिसेंबरला सर्वांची एकत्रित मतमोजणी होणार आहे.
आज निकाल होईल या अपेक्षेने तयार असलेल्या कार्यकर्त्यांना आदेश आल्यानंतर शांत बसावे लागले.
भद्रावतीत सर्वत्र एकच चर्चा
“निकाल आज नव्हे… आता थेट २१ तारखेलाच!”

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!