Friday, April 17, 2026
Homeभद्रावतीसंताजी नगरचा ‘डांबरीकरण’ विकास अखेर सुरू; भव्य भूमिपूजन सोहळा पार..!

संताजी नगरचा ‘डांबरीकरण’ विकास अखेर सुरू; भव्य भूमिपूजन सोहळा पार..!

नागरिकांकडून इम्रान खान यांच्यावर कौतुकाचा वर्षाव…

आ. करण देवतळे यांच्या मार्गदर्शनात मिळाला निधी; वर्षानुवर्षांच्या समस्यांना दिलासा

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

भद्रावती शहरातील संताजी नगर परिसरासाठी अत्यंत महत्त्वाची घडामोड घडत आज रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांचे भव्य भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. नगर परिषद निवडणुकीपूर्वी मंजूर करण्यात आलेल्या निधीतून या कामांना अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रसंगी गेल्या अनेक वर्षांपासून संताजी नगर परिसरातील नागरिकांना खराब रस्ते, चिखल आणि धुळीच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होत होती. या पार्श्वभूमीवर, आमदार करण देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमो प्रदेश सचिव तथा जनसेवक इम्रान खान यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत या कामासाठी निधी मंजूर करून घेतला.
यादरम्यान आज पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्याला स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकल्पांतर्गत केवळ रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असले तरी, त्याचा थेट फायदा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे.
याशिवाय रस्त्यांची दुरवस्था, वाहतुकीतील अडथळे आणि पावसाळ्यातील त्रास या सर्व समस्यांना आता मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
भूमिपूजनानंतर संताजी नगरवासीयांनी एकत्र येत भाजयुमो प्रदेश सचिव इम्रान खान यांचे मनापासून आभार व्यक्त केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हे काम मार्गी लागल्याचे नागरिकांनी स्पष्टपणे नमूद केले.
“आजपर्यंत फक्त आश्वासने मिळत होती, पण आता प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. हा आमच्यासाठी मोठा दिलासा आहे,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
एकूणच, संताजी नगर परिसराच्या विकासाचा नवा अध्याय आजपासून सुरू झाला असून, येणाऱ्या काळात या भागाचा चेहरामोहरा पूर्णतः बदलणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!